माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

0

ब्युरो, मुंबई: अतिरिक्‍त पोलिस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. आज, शुक्रवारी सकाळी त्यांनी बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेत आत्‍महत्या केली. रॉय गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्‍त होते. तसेच ते दीर्घ मुदतीच्या रजेवर होते. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्‍महत्या केल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे.

 

हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१३ मध्ये झालेल्या आयपीएलच्या स्‍पॉट फिक्‍सिंग प्रकरणात त्यांनी विंदू दारासिंहला अटक केली होती. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याचा ड्रायव्‍हर आरिफ बाईल याच्यावर झालेले गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान हत्या प्रकरण अशी महत्त्‍वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात रॉय यांची महत्त्‍वाची भूमिका होती. 

 

हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल केसेस हाताळल्या होत्या. हिमांशू रॉय यांनी अनेक मोठ मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे देखील बाहेर आणले. आयपीएल बेटिंग-ललीत मोदी प्रकरण, जेडे मर्डर केस हिमांशू रॉय यांनी उघड केली आहे. हिमांशू रॉय अनेक केसेस पर्सनली मॉनिटर करत होते. हिमांशू रॉय हे बॉडीबिल्डर ऑफिसर होते, शरीर यष्टीने अतिशय फिट असे हिमांशू रॉय होते, हिमांशू रॉय मागील एक दीड वर्षापासून मेडिकल लिव्हवर होते. हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय विक होते, असंही सांगण्यात येत आहे. 

 

हिंमाशू रॉय यांनी तोंडात गोळी झाडली, त्यांना तात्काळ उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाला होता. हिमांशू रॉय यांना कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर बरा होत होता, पण त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं, असंही त्याच्या काही जवळच्या लोकांनी सांगितलं होतं. हिमांशू रॉय हे हाय प्रोफाईल केसेस उघड करण्याच्या बाबतीत नावारूपास आले होते.

 

रॉय यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्‍हे शाखेचे प्रमुख, नाशिकचे पोलिस आयुक्‍त म्‍हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. रॉय यांच्या अचानक आत्‍महत्येच्या प्रकरणामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.