बेलदार समाजातर्फे राज्यस्तरीय उपवर वधु परिचय मेळावा

विविध कार्यक्रमांचे आयोजन

0 276

रफीक कनोजे, झरी: महाराष्ट्र बेलदार समाज महासंघ प्रेरित युवा बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था मुकुटबन तर्फे १४ जानेवारी ला राज्यस्तरीय बेलदार समाजाचे भव्य अधिवेशन सोहळ्याचे आयोजना सह राजा भगीरथ भवन ओम नगरी मुकूटबन येथे उपवर वधु परिचय मेळावा, राजा भगीरथ जयंती , नवीन शेडचे भूमिपूजन, गुणवंत विद्यार्थी चे सत्कार, सेवानिवृत्त व समाजसेवक बांधवांचा सत्कार, व महिलांचे हळद कुंकु च्या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार असून प्रमुख अतिथी व पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या संगीता मानकर, सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, माजी सरपंच प्रमोद बरशेट्टीवर, सचिव जय बजरंग संस्थेचे गणेश उदकवार ,तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर चेलपेलवर, मनोज गादेवार, निलीमाताई उदकवार, नानासाहेब ताटेवार, प्रभाकर तेलकापेल्लीवार ,नारायण चेलपेलवार, डॉ राजुभाऊ ताटेवार, जामुवंत कुरमेलवार , डॉ राज कंठावार, भगवान प्यारलेवार, बाबाराव ताटेवार, दीपक बरशेटीवार, गजानन बरशेटीवार, दत्तू चिंतावार उपस्थित राहणार आहे,

सदर कार्यक्रमाला प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक लाभले आहे, वधू-वर परिचय मेळाव्या सह वरील कार्यक्रमाचा लाभ घेऊन उपस्थतीत राहण्याचे आवाहन अध्यक्ष बालाजी मुददमवार , उपाध्यक्ष तुषार यमजलवार , कार्याध्यक्ष मयुरेश ताडशेट्टीवार सह समस्त बेलदार समाज , युवा बेलदार समाज व महिला बेलदार समाज मुकुटबन तर्फे करण्यात आले .

You might also like More from author

Comments

Loading...