भेंडाळा ग्रामवासियांची दोन शिक्षकांची मागणी

शिक्षक न दिल्यास उपोषणाचा इशारा

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत २ शिक्षक कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाशी खेळ होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत दोन शिक्षक द्यावे अशी मागणी भेंडाळावासीयांनी केली आहे.

भेंडाळा शाळेत १ ते ७ वर्ग पर्यंत तुकड्या आहेत. यात मुलामुलींची एकूण पटसंख्या ९२ आहे. तर या विद्यार्थ्यांसाठी फक्त ३ शिक्षक आहेत. त्यातही एका शिक्षकाची बदली करण्यात आली ज्यामुळे आता तिथे फक्त दोनच शिक्षक आहे.

वर्ग १ ते ५ ची पटसंख्या ६१ असून वर्ग ६ ते ७ वर्गाची पटसंख्या ३१ आहे. ९२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दोन शिक्षकाची मागणी केली आहे.

शिक्षक न दिल्यास पंचायत समिती समोर उपोषण बसण्याचा इशारा गजानन धांडे, मारोती गिरसावळे, विनोद सरांतवरकर, संदीप गोंडे, संतोष पानघाटे, मारोती रोहणे, राकेश लेनगुळे, मंगेश धांडे,अमोल येलादे, किशोर झाडे सह गावकर्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.