बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

VYM ब्लड गृप व रामनवमी आयोजन समितीचा उपक्रम

0

देव येवले, मुकुटबन: 15 नोव्हेंबरला क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सरस्वती बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेत VYM ब्लड गृप नेटवर्क ऑर्गनायझेशन व रामनवमी आयोजक समितीच्या वतीने गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन, कलर पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे व ईतर शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी गणेश मुद्दमवार, प्रफुल भोयर, अजय बाज्जलावार, अतुल विधाते, हेमंत गेडाम, जयंत उदकवार, केतन ठाकरे, राजू कांबळे, चेतन म्याकलवार, आदित्य बरशेट्टीवार, योगेश बच्चेवार, संकेश नामपेल्लीवार व VYM टीम चे कार्यकर्ते आणि रामनवमी आयोजक समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.