मुकुटबन बाजार समितीमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठी चर्चासत्र मेळावा

0

सुशील ओझा, झरी: कृषी उत्पन्न बाजार समिती झरी मुख्यालय मुकुटबन तर्फे शेतकऱ्यांकरिता कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाय व चर्चासत्राचे आयोजन बाजार समितीच्या हॉलमध्ये करण्यात आले.या मेळाव्यात शेतकऱ्यांना बोंडअळीपासून कापूस पिकाला कोणत्या प्रकारे वाचवावे याकरिता उपस्थित मान्यवर तथा कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध योजनेबाबतही माहिती देण्यात आली.   उपस्थित असलेल्या शेतकर्याना मोफत फेरोमन ट्रॅपचे वाटपही करण्यात आले.

फेरोमन कीटक हा एका दिवसात ४०० अंडी घालते. त्यापासून शेकडो कीटक जन्म घेऊन कपाशीवर हल्ला करून पिकाचे नुकसान करून पीक नष्ट करतात. ज्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतो. पिकांचे नुकसान होऊ नये याकरिता बाजार समितीत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप चे वाटप करण्यात आले. याकरिता बाजार समितीसह मुकुटबन  व्यापारी असोसिएशन, रिलायन्स सिमेंट कंपनी व पाटणबोरी येथील कृषी असोसिएशन यांनी सहकार्य केले.

बोंडअळी चर्चा मेळाव्यात आलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीकडून जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती हे विशेष . शेतकऱ्यांना शेती विषयी अती महत्वाची माहिती मिळाल्याने शेतकरी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार होते तर  उदघाटक प्रदीप मासिरकर, प्रमुख मार्गदर्शक डॉ यादगीरवार, कीटकनाशक शात्रज्ञ , औरंगाबाद येथील कापूसतज्ज्ञ गजानन जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी शेरखाने, तालुका कृषी अधिकारी गडदमवर, तालुका कृषी पंचायत समिती जगदीश बेंडे, प्रकाश म्याकलवार, शुभांगी बेलखेडे, बाजार समिती सभापती संदीप बुरेवार, उपसभापती संदीप विचू, पुरुषोत्तम आवारी, रामकृष्ण वांजरीकर, राजू येलटीवार, भूमारेड्डी बाजनलावर, रामन्ना येलटीवार, विनोद गोडे, नागोराव उरवते, भूमारेड्डी येनपोतुलवार व शेकडो शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सहसंचालक यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी तर आभार सचिव रमेश येलटीवार यांनी मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.