बोटोणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0 214

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोनी येथे जि.प प्राथ.शाळा येथे मंगळवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या तर्फे आयोजित केला गेला होता. आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी साठी मोठ्या प्रमाणात रुग्ण आले होते.

आजच्या महागाईच्या काळामध्ये आरोग्य सेवा ही महाग झाली असल्याने वृद्धांना या साठी बरीच धावपळ करावी लागते. शिबिराच्या आयोजनामुळे येथील बऱ्याच रुगणाना दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गेडाम, मारेगाव शिवसेना ता.अध्यक्ष गजानन किणेकार बोटोनी ग्राम पंचायतीचे उप सरपंच तुकाराम वासाडे, मनोज मत्ते व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like More from author

Comments

Loading...