दहेगाव (घोन्सा) चे शिक्षक वेतना पासून वंचित

पासवर्ड बदलल्याचे प्रकरण, प्रशासन कधी घेणार दखल  

0

वणी(रवि ढुमणे): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव (घोंसा)  येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणकीय पासवर्ड परस्पर बदलवून हेराफेरी केल्याची तक्रार संबंधित शिक्षकाने पोलिसात दिली होती.   परिणामी ऑनलाईन ची कामे ठप्प झाली. पासवर्ड नसल्याने आता येथील शिक्षकांचे पगार सुद्धा थांबले आहे. मात्र वणीचा शिक्षण विभाग जावईशोध लावण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

वणी तालुक्यातील  जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा दहेगाव(घोन्सा)चे तत्कालीन मुख्याध्यापक विजय पाटील याचे समायोजनानंतर त्यांच्या कडील प्रभार  हरिहर निमसटकर यांचेकडे हस्तांतरी करण्यात आला होता.  सोबतच शाळेचे पासवर्ड देण्यात आले होते. त्यात पासवर्ड मध्ये शालार्थ चा पासवर्ड समाविष्ठ नव्हता. मिळालेले पासवर्ड आधीच आधीच बदलविल्या गेल्याचे निमसटकर यांच्या लक्षात आले.

ही बाब गटशिक्षणाधिकारी पं.स वणी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी रितसर तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुकुटबन पोलीस स्टेशन येथे पासवर्ड बदलविल्या गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.  परंतू पासवर्ड ज्या ठिकाणी बदलला ते स्थळ मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येत नसल्याने सदर तक्रार वणी ठाण्यात वर्ग करण्यात आली.

त्यानंतर शालेय कामकाज नियमित करण्याच्या दृष्टीने पासवर्ड उपलब्ध करुन देण्यात यावे अशी विनंती गटशिक्षणाधिका-यांना करण्यात आली. पण शालर्थचा पासवर्ड मिळवून देण्यास सहकार्य मिळाले नाही.  प्रशासनाला  सर्वघटनाक्रम माहीत असूनही माहे नोव्हेबर 2017 चे वेतन काढून देण्यास सहकार्य मिळाले नाही. परिणामी सर्वच शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागले आहे. शिक्षण विभाग अडलेले वेतन काढून देणार की नाही .असा प्रश्न आता शिक्षकापुढे उभा आहे.

यात वणी गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधितांना पत्रव्यवहार केला खरा. परंतु सध्या असलेले प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे त्या काळात झरी येथे होते. मात्र त्यांनी सदर प्रकाराला बगल देण्यासाठी  चुकीचे पत्र दिले आहे.  १२/०५/२०१७ अशी तारीख दर्शविण्यात आली आहे. हरिहर निमसटकर यांचेकडे शालेय प्रभार आगस्ट २०१७ला सोपविण्यात आला. परंतू तत्कालीन गटशिक्षणाधिकारी हाडोळे यांच्या काळात निमसटकर यांनी प्रभार घेतला होता हे विशेष!

सदर प्रकरणाची मुकुटबन पोलिसांनी तपासणी केली तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली.  यात ज्या व्यक्तीने पासवर्ड बदलला त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद असल्याचा स्क्रीन शॉट सुद्धा काढण्यात आला आहे. यावरून सदर प्रकरण कोणते वळण घेईल ही येणारी वेळच ठरवेल. मात्र सध्यातरी या पासवर्ड च्या हेरफेरीत दहेगाव येथील शिक्षक पगारापासून वंचित राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.