वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे माध्यम: जब्बार चिनी

0 248

सुरेन्द्र इखारे, वणी: स्वातंत्र्यपूर्व काळात काही थोरपुरुषांनी स्वातंत्र्यच्या प्राप्तीसाठी व जनजागृतीसाठी वर्तमानपत्राची सुरुवात केली. वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे माध्यम आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार जब्बार चिनी यांनी व्यक्त केले. वणी येथील दर्पण पत्रकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सायंकाळी 6 वाजता दर्पण पत्रकार भवनात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष जब्बार चिनी हे होते. प्रमुख अतिथी दर्पणचे सचिव सुनील जीवने, उपाध्यक्ष मोहम्मद आरिफ हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेन्द्र इखारे यांनी केले तर आभार राजू गव्हाणे यांनी मानले. याप्रसंगी भूषण शर्मा, रामकृष्ण वैद्य, राजेंद्र दडाजे, सूरज चाटे, सुधा पेटकर, रोहित वनकर, उपस्थित होते.

mirchi
Comments
Loading...