गाडीला झाला अपघात, अन् उघडकीस आली दारू तस्करी

अवैध धंदे बंद झाल्याचा दावा फोल, तस्करांवर कुणाचा वरदहस्त?

0

विवेक तोटेवार, वणी: एक कार भरधाव वेगाने येत होती. समोर एसटी महामंडळाची गाडी होती. कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळा अचानक कारला अपघात झाला. एसटीत बसलेले सर्वांचे श्वास रोखले गेले. प्रवासी कुणाला काय मार लागला हे पाहण्यासाठी बाहेर आले. तर कारमध्ये कुणीच नाही आणि कार भरली होती दारूच्या बाटल्यांनी. प्रवाशांना लगेच हे दारू तस्करीचं प्रकरण असल्याचं कळलं. गुरुवारी 11 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी इटीएस क्रॉस ही कार (एम एच 29 ए डी 5705) वणीवरून दारू घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात जात होती. वणी-वरोरा रोडवरील चौफुलीवर पॅट्रोलिंगवर असताना पोलिसांना एक पांढरी गाडी संशयास्पदरित्या आढळली. त्यांनी लगेच संबधीत वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचं पाहून कार ड्रायव्गरने वेग आणखी वाढवला. दरम्यान एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना कारने बसला धडक दिली. एसटी मधले लोक बाहेर आले. काही वेळाने पोलीसही घटनास्थळी पोहचले. मात्र त्या गाडीतील मागच्या सिटवर त्यांना दारू आढळून आली. दारू तस्करांनी अपघात होताच रस्त्या लगतच्या शेतातून पलायन केले.

पोलिसांना आरोपीस धावून पकडने शक्य झाले नाही. या ठिकाणी डी बी पथक आरोपीस पकडण्यात पूर्णपणे अयशस्वी झाले. मात्र पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन बघितले असता त्यामध्ये 25 पेट्या देशी दारू व दोन पेट्या इंग्रजी दारू ज्याची किंमत 78440 व वाहनाची किंमत 4 लाख 50 हजार असा एकूण 5 लाख 28 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अज्ञात आरोपीवर कलम 279, 427 भा द वी, 65(अ) (इ) महाराष्ट्र दारुबाफी कायदा, सहकलम 179(2), 134 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

वणी तालुक्यातून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भरदिवसा दारू तस्करी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. अवैध व्यवसायाबाबत प्रशासन झोपेचं सोंग घेऊन असल्याचं दिसतंय. राजकीय पक्ष अवैध व्यवसायाविरोधात आक्रमक झाले आहे. मात्र त्यांच्या निगरगट्ट झालेल्या या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष केलं आहे. परिसरात अवैध धंदे कुठे आहे याची माहिती सर्वांना आहे मग हे प्रशासनाला का दिसत नाही असा प्रश्न वणीकर जनता उपस्थित करीत आहे.

वणी बहुगुणीशी बोलताना शिवसेनेचे शहर अध्यक्ष राजू तुराणकर यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की अपघात झाल्याने हे दारू तस्करीचं प्रकरण उघडकीस अालं जर अपघात झाला नसता तर ही तस्करी पचली असती. घटनेची माहिती होताच आम्ही तिथे पोहोचलो हे प्रकरण दाबण्याचा खटाटोप तिथे दिसत होता. अवैध धंदे बंद झाल्याचा दावा फोल असून परिसरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहे. आता अल्टिमेटम खूप देऊन झाले यापुढे शिवसेना स्टाईल यावर तोडगा आवश्यक आहे. असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.