तानेबाई बेलूरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

0 485

बहुगुणी डेस्क, वणी:- भाजपाचे शहराध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे शहर प्रतिनिधी रवी बेलूरकर यांची आई तानेबाई सदाशिव बेलूरकर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घ आजाराने मंगळवारी 6 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे वामन, पंजाब व रवी अशी तीन मुले सुना व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. येथील मोक्षधाम वर 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत राजाभाऊ पाथ्रडकर, तालुका संघ चालक हरिहर भागवत, राजू उंबरकर, डॉ. महेंद्र लोढा, विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख यवतमाळचे प्राचार्य श्रीकांत परबत, माजी आमदार संदीप धुर्वे, प्रशांत माधमशेट्टीवार, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेंडे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. अध्याक्षिय समारोपानंतर उपस्थितांनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली.

mirchi
Comments
Loading...