धानोरा (लिंगटी) गावातील शेतकऱ्याच्या घराला आग

चक्की, बैलगाडीसह शेतीउपयोगी साहित्य जळून खाक

0

सुशिल ओझा, झरी: तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्याच्या घराला आग लागून चक्की, बैलगाडी सह शेतीउपयोगी व घरातील वस्तू जळून खाक झाले आहे. यात सुमारे 3 लाख 20 हजाप रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार धानोरा गावातील काही लहान मुले दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान खेळत होते. त्यावेळी अचानक घरातून धुवा व आग निघू लागल्याचे मुलांना दिसले. आग बघुन मुलांनी आरडाओरड केली. आवाजामुळे सर्व गाव घटनास्थळ कडे धावलं. आग विजवायला सुरवात केली. परंतु आग आटोक्यात येण्यापूर्वी घरातील शेतीउपयोगी वस्तू व चक्की जळून खाक झाली होती. आगीत शेतकरी रमेश गणपत पोतराजवार यांचे ३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

घराला व चक्कीला आग लागल्याची माहिती पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना त्वरित देण्यात आली. तहसीलदार खिरेकर व ठाणेदार शिवाजी लष्करे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पांढरकवडा, वणी येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. चार वाजेपर्यंत अग्निशमन दलाची गाडी पोहचली नाही. अखेर गावकर्यांनी वाटेल ते प्रयत्न करून ७० टक्के आग आटोक्यात आणली.

विशेष म्हणजे आग लागलेले घर मध्यवस्तीत असल्याने इतर घराला वाऱ्यामुळे आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु गावकर्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आली. चार वाजता अग्निशमनची गाडी आली व आग विझवायला सुरूवात झाली. महसूल च्या पंचनाम्या नुसार सदर शेतकऱ्याचे नुकसान ३ लाख २० हजार आहे. आगीमध्ये शेतकरी रमेश पोतराजवार यांच्या  घरातील लोखंडी टिनपत्रे ४०, पिठगिरणी ऑइल इंजन, बैलबंडी २,  स्पिनकलर पाईप ६०, नागर २, वखार २, बैलबंडीचे जु ६, तिफन १, सागवान डेरी ४० ,सागवान फाटे ६०, दरवाजे ४, ट्रेकटर टायर, किराणा समान, कडबा कुटार, असे घर व शेती उपयोगी वस्तू जळल्याने आर्थिक संकटात आला असून यावर्षी शेती करण्यास अडचण निर्माण होणार आहे.

घटनास्थळी पटवारी येरमे व सचिव सैयद युनूस यांनी पंचनामा केला. तर आग विजविण्याकरिता गावातील संतोष माहुरे, सुरेश पोतराजवार, गंगाधर तूडूमवार, संजय बरबटवार, शालीक सासनवार, गणपत पवार, मारोती सासनवर, निलेश चौधरी, गजानन सासनवार, विजय चेनूरवार, मिथुन ठाकरे, माशटवार सर सह गावकर्यांनी मदत केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.