झरी तालुक्यात २१ अंगणवाड्या डिजिटल

0

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणत: २१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास विभागाच्या सुनीता भगत यांनी घेतला आहेत..

तालुक्यातील आतापयंर्त २१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत तर ७२ केंद्राला खेळणी, साहित्य पुरविण्यात आली आहेत. यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास होणार आहे..

तालुक्यात १०६ मोठ्या अंगणवाड्या तर ३० मिनी अंगणवाड्या आहेत. तर १३६ अंगणवाडी सेविका काम पाहत आहेत तालुक्यातील मुकुटबन १, मुकुटबन २, मुकुटबन ३ व ४, अडेगाव १, अडेगाव २, खडकी, जुनोनी, चिचघाट, कुंडी, हिवरा बारसा, सुसरी, झमकोला, अडकोली आणि येवती या २१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनीता भगत यांनी दिली. .

या करिता जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, शिवाजी गवई यांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले..

Leave A Reply

Your email address will not be published.