डॉ. दिलीप अलोणे यांना सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार

14 जूनला मुंबईमध्ये होणार पुरस्कार देऊन सन्मान

0
बहुगुणी डेस्क, वणी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेतर्फे यंदाचा स्व. कमलाकर वैशंपायन स्मृती सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांत 14 जून 2019 रोजी मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनाला आयोजित कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते डॉ. दिलीप अलोणे यांचा गौरव होणार आहे.
डॉ. दिलीप अलोणे हे गेल्या चाळीस वर्षांपासून सातत्याने नकला हा लोककला प्रकार टिकून राहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. नकला या उपेक्षित कलाप्रकाराला प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच या लोककला प्रकाराला सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभरात शेकडो कार्यक्रम केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहेत.
याआधीही महाराष्ट्र शासनाने त्यांना 2011 मध्ये महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परिसरातील नाट्य व कला चळवळ जिवंत राहण्यासाठी आजही ते विद्यार्थ्यी व परिसरातील छोट्या मोठ्या कलाकारांना घेऊन प्रयत्नशील राहतात. साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. कथा, कादंबरी, कवितासंग्रह, संशोधनपर लेखनही त्यांनी विपुल प्रमाणात केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.