विजेचा धक्का लागून दिलीप गोहोकार यांचा मृत्यू

0 2,531

विलास ताजने, वणी : वणी येथील जिजाऊ नगर मध्ये बांधकाम चालू असलेल्या घरी विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १४ सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दिलीप दादाजी गोहोकार वय ४३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दिलीप गोहोकार यांचा मूळ गाव दहेगाव (घोंसा) आहे. ते अडेगाव येथील आदर्श विध्यालयात लिपिक या पदावर कार्यरत होते. तर नगर परिषद शाळा क्र.५ वणी जवळ त्यांचे घर आहे. 

जिजाऊ नगर मध्ये आदर्श विद्यालय साखरा (कोलगाव) येथील शिक्षक राजेंद्र बच्चेवार यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घराच्या टॉवरवरून ११ केव्ही लाईनच्या विजवाहक तारा आहे. या तारांना स्पर्श होऊन गोहोकार यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सदर घटनेत विजवाहक तार तुटून पडली. तर मृतकाचे शरीर जळाले आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे

750 X 422 PODDAR
Comments
Loading...