बोरी (खुर्द) मध्ये वीजेचा खेळखंडोबा, अभियंत्याला दिलं निवेदन

वीज वितरण कंपनीचं ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

0 192
प्रतिनिध, मारेगाव: मारेगावपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी खुर्द मदनापुर इथं विद्युत पुरवठा नेहमी खंडीत होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा यासाठी विद्युत पुरवठा अभियंत्यांना निवेदन दिलं आहे.
बोरी खुर्द हा कमी लोक संख्या असलेलं गाव आहे. गावाच्या लगतच मोठं जंगल आहे. या परिसरातून ग्रामस्थांना रात्रीच्या वेळेस येणं जाणं करावं लागतं. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे साप, विंचू तसंच जंगली प्राण्यांची भीती आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवावा अशी मागणी गामस्थांनी केली आहे.

 

(मारेगावचं जुनं बसस्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात, तर नवीन बसस्टॉप बनला गप्पा मारण्याचा अड्डा)

वीजेच्या लपंडावामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव आहे. तसंच मोबाईल रिचार्जही लोकांना करता येत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहे.  अखेर त्यांनी अभियंत्याला निवेदन देऊन विद्युत सेवा नियमित करण्याची मागणी केली आहे. यावेळेस रंजीत सुरपाम भगवान उइके, नरेंद्र उइके, नरेंद्र किनाके, विनायक किनाके, प्रवीण सोयाम, बाबाराव मानकर, संजय सोयाम, कल्पना गावंडे, दिलीप कुरसाने, आदी नागरिक उपस्थित होते.

You might also like More from author

Comments

Loading...