पर्यावरण वाचविणे प्रत्येकाची जबाबदारी: प्रा.गजानन सोडनर

0 241

ज्योतिबा पोटे, मारेगाव: काळ बदलत गेला तसा मानवाने आपल्या जीवनात बदल घडवुन आणला. पर्यायाने आजच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनाच्या गैरवापर वाढला. त्यामुळे पर्यावरणात बदल झाल्याने मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला. आज मानवाला अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने पर्यावरण वाचविने प्रत्येकाच्या कर्तव्य असल्याचं मत प्रा. गजानर सोडनर व्यक्त केलं. कवडसी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण अभ्यास दौर्या दरम्यान ते बोलत होते.

दि.१० मार्चला कला वाणिज्य महाविद्यालया द्वारे पर्यावरणशास्त्र विभागाद्वारे कवडशी येथील मल्हारगडावर अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौर्यात बी.ए. ,बी.कॉम ,बी. एस्सी मधील भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्राणीशास्त्र विभागाच्या मंजु परदेशी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी मल्हारगड मधील निसर्ग सौंदर्य व प्राणीजीवन अनुभवले. या दौर्याच्या यशस्वीतेकरिता कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. बाळासाहेब देशमुख, प्रा. माधुरी तानुरकर, प्रा.संतोष गायकवाड, प्रा.विजय भगत, प्रा.विभा घोडखांदे, प्रा.डॉ. प्रदीप सौदागर यांनी प्रयत्न केले.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...