मंगळवारी मध्यरात्री फेसबुक हॅकर्सचा धुमाकुळ

सावधान मुलींनो... फेसबुक आयडी हॅक करून अनेकांना गंडा

0

बहुगुणी डेस्क: मध्यरात्री अचानक एका मुलीला फेसबुकवर फ्रेंडलिस्ट मधल्या दुस-या मुलीचा मॅसेज आला की तुझे फोटो एका मुलाने एका साईटवर अपलोड केले आहेत. या प्रकाराने ती मुलगी घाबरली. दुस-या मुलीने लगेच एक लिंक पाठवली व त्यावर चेक करण्यास सांगितले. लिंकवर क्लिक केले असता तिथे पासवर्ड विचारला गेला. दुस-या मुलीने तिथे फेसबुकचा पासवर्ड टाकायला सांगितला. बस इथेच हे अकाउंट हॅक झाले. त्याच वेळी पहिल्या मुलीच्या फेसबुक आयडीचा पासवर्ड बदलला गेला व ती लॉग इन करू शकली नाही. या प्रकाराकडे तिने दुर्लक्ष करून उद्या बघू असा विचार केला. मात्र दुसरीकडे ती आयडी हॅक करून काही वेगळेच प्रकार मध्यरात्री तिच्या आयडीवरून सुरू झाले.

हॅकरने हॅक झालेल्या आयडीवरून काही पुरुष आयडीला मॅसेज केले की आपल्याकडे पेटीएम किंवा भीम ऍप आहे का? ज्यांनी हो असे उत्तर दिले त्यांना हॅकर्सने अर्जंट दोन हजारांची गरज असल्याचे सांगून पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. तसेच उद्या सकाळी परत करते असे रिप्लायही दिले. तर त्याच अकाउंटवरून काही मुलींना मॅसेज करण्यात आले की तुझे फोटो एका मुलाने एका साईटवर टाकले आहे. व सोबत लिंक पाठवली. यात अद्याप किती मुली फसल्या व किती पैसे उकळले गेले याची माहिती आली नाही.

सकाळी अकाउंट हॅक झालेल्या मुलीने तिचा फेसबुक आयडीचा पासवर्ड रिकव्हर केला. तेव्हा तिला धक्काच बसला. अनेकांना त्या अकाउंटवरून मॅसेज पाठवल्याचे तिच्या लक्षात आले. मध्यरात्री काही मुलींनी असा काहीसा प्रकार फेसबुकवर सुरू असल्याचे फेसबुकवर टाकले होते व कुणीही पैसे सेंड करू नका असे आवाहन केले होते. पण त्या वेळे पर्यंत हॅकर्सने काम साधले होते.

सकाळी अकाउंट हॅक झालेल्या मुलीने ही गोष्ट फेसबुकवरून मांडताच एकच खळबळ उडाली. अनेक मुलं आणि मुली समोर आले की आम्हाला ही असे मॅसेज आलेत. मात्र अद्याप किती लोकांना आणि किती पैशाने हॅकर्सने गंडवले हे अद्याप समोर आले नाही. हॅकर्स मराठीत मॅसेज करत असल्याने अनेकांना याबाबत शंका येत नाही.

पुरुषांनो सावध राहा.. तुम्ही होऊ शकता पुढचे सावज
एखाद्या मुलीचा स्वतःहून हाय, हॅलो मॅसेज आला की मुलांच्या मनात उकळ्या फुटायला सुरूवात होते. त्यातच जर मध्यरात्री असे मॅसेज आले तर मग काही विचारायची गोष्टच नाही. त्यामुळे भावनिक न होता कोणालाही पैसे पाठवू नका. जर ते अकाउंट ओळखीचे असेल तर आधी कॉल करून त्याबाबत विचारणा करून घ्या.

मुलींनो सावधान… घाबरू नका…
जर तुम्हाला एखाद्या मुलीचा तुमचे कुणी तरी फोटो अपलोड केले असल्याचा मॅसेज आला. तर घाबरू नका. असे कोणीही तुमचे फोटो सोशल साईटवर अपलोड करू शकत नाही. शिवाय कुणी असे सांगून लिंक सेंड करत असेल तर त्या लिंकवर चुकुनही क्लिक करू नका. जर लिंकवर क्लिक झाले असेल तर त्यावर कोणत्याही परिस्थितीत तुमचा फेसबुकचा पासवर्ड टाकू नका. जर कुणी तुम्हाला असे मॅसेज पाठवले तर आधी याची कल्पना पोलीस स्टेशनला द्या. नेटवरून सायबर क्राईम विभागाकडे ऑनलाईन तक्रारही करता येते.

अकाउंट हॅक होऊ नये यासाठी काय करावे?

  • पासवर्डमध्ये किमान 12 डिजिट असायला हवे. त्यात कॅपिटल लेटर्स (उदा. A, B, C) स्पेशल सिंबॉल (@, #,) सोबतच काही नंबर्सचाही समावेश करावा. उदा. MyPassword@#123
  • तुमच्या फेसबुक आयडीला जो इमेल आयडी जोडला आहे. त्याचा पासवर्ड लगेच चेंज करा. त्यात वरील प्रमाणे स्पेशल सिंबॉल, नंबर, कॅपिटल लेटर्स याचा समावेश करा.
  • सर्वात महत्त्वाचे… फेसबुक आणि इमेलचा आयडी चेंज केल्यावर logout from all device यावर क्लिक करून पुन्हा लॉग इन करा.

लिंकवर क्लिक करून पाहा कसे केले हॅकर्सने अकाउंट हॅक….

Leave A Reply

Your email address will not be published.