वणी, मारेगावमध्ये सुकाणू समितीचं रास्ता रोको आंदोलन

शेतक-यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन

0

वणी, मारेगाव टीम: कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने फसवणूक केल्याने सरकारच्या विरोधात राज्यभर रास्ता रोको होत आहे, वणीतही 14 ऑगस्ट सोमवारी दुपारी 12 वा. जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शेतक-यांच्या विविध मागण्या घेऊन किसान क्रांती मोर्चाच्या नेत्तृत्वात सुकानु समितीनं आंदोलनाची हाक दिली आहे. यात शेतक-यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यातील शेतक-यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेतक-यांना सरसकट कर्जमुक्त करावे व त्यांच्या शेतमालाला हमी भाव अधिक 50 % नफा भाव घोषित करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, दूधाला 50 रुपये प्रती लीटर भाव देण्यात यावा, यासह विविध मागण्याना घेऊन ता. 1 जून ते 7 जून दरम्यानं शेतक-यांनी आंदोलन उभारले होते. तेव्हा सरकारने शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. पण त्यानंतर सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक केली, कर्जमाफीसाठी जाचक अटी लावल्या. त्यामुळे शेतक-यांच्या न्यायासाठी राज्यात सुकाणू समिती गठित करण्यात आली. या समितीची वणी विभागीय समिती देखील गठित करण्यात आली आहे.

सुकाणू समितीच्या वतीने वणी, झरी, मारेगाव तालुक्यात शेतक-यांना घेऊन विविध बैठकी सुद्धा घेण्यात आल्या आहे. तिन्ही तालुक्यात रास्ता रोको आंदोलन होत असून वणीतील जिजाऊ चौक चिखलगाव फाट्यावर या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात हजारो शेतक-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने देवराव पाटील धांडे, ऍड. देविदास काळे, जयसिंग पाटील गोहोकार, शंकर दानव, अनिल घाटे, मिलिंद पाटील, दिलीप परचाके, इंजि. अनंत मान्डवकर, दिलीप भोयर, दशरथ पाटील, अजय धोबे, टिकाराम कोगंरे, बालाजी काकडे, इरफान पठान, मनोज काडे, मंगल तेलंग, कृष्णाजी ढुमणे, दत्ता बोबडे, अँड. अमोल टोन्गे, कुमार मोहरमपुरी इत्यादींनी केले आहे.

मारेगाव येथे सुकाणू समितिचा जिजाऊ चौकात चक्काजाम आंदोलन

शासनाच्या शेतकरी कर्जमाफी धोरणा विरोधात सुकाणू समिती मारेगाव तालुक्याच्या वतीने जिजाऊ चौकात सोमवारी 14 ऑगस्टला दुपारी 12 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागन्यासाठी व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत शेतक-यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सुकाणू समितीचा लढा चालु राहील असं सुकाणू समितीच्या प्रतिनिधींनी वणी बहुगुणीशी बोलताना सांगितलं. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.