रासा येथील खताच्या बॅग चोरट्यास केली अटक

0
विवेक तोटेवार, वणी;  तालुक्यातील रासा येथील कृषी केंद्र चालकाच्या तक्रारीवरून 21 जून रोजी खताच्या बॅगा चोरी गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधत होते. लगेचच एका दिवसात वणी पोलिसांनी आरोपीला जेरेबंफ केले आहे.
रासा येथे उल्हास सत्यनारायण वरारकर यांचे कृषी केंद्र आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने खताच्या बॅग त्यांनी आपल्या गोदामात ठेवल्या होत्या. हळूहळू रासायनिक खतांच्या बॅग कमी होत असल्याचे सत्यनारायण यांच्या लक्षात आले. 21 जून रोजी गोदांचे कुलूप उघडे दिसले. त्या ठिकाणी 45 खताच्या बॅग कमी आढळल्या.त्यांनी त्वरित वणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. शोध घेत असताना त्यांनी आरोपी विनोद शामराव सूर (30) व सचिन विनायक आत्राम (25) याना अटक केली. विचारपूस केली असताना त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून खताच्या 45 बॅग किंमत 46395 जप्त करण्यात आल्या. आरोपीवर कलम 461, 380 भा द वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार धर्मेंद्र देमाजी आळे , सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अजय शेंडे, नितीन सलाम, सुदर्शन वनोळे यांनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.