तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विठ्ठलनगर (विरकुंड ) येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी 6 जानेवारी रोजी घडली आहे.
तालुक्यातील विठ्ठलनगर ( विरकुंड) येथे राहणाऱ्या अंकिता वासुदेव नागलकर (17) हिने काही कारणावरून आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर वणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. यानंतर अंकीताच मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तापसणीकरिता आणण्यात आला.
आत्महत्येचे करण समजू शकले नाही. अंकीताच्या वडिलांचा दोन वर्षाअगोदार मृत्यू झाला होता. ती तिच्या आईसोबतच राहत होती. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.