वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी जागृत राहण्याची गरज- तहसीलदार विजय साळवे

0

नागेश रायपुरे, मारेगाव : नैसगिक वस्तू ही फसवू शकत नाही, परंतु मानवनिर्मित वस्तू आपल्याला फसवू शकते. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत व वैधता तपासून घेऊन ग्राहकांनी आज जागृत राहण्याची गरज आहे, असे तहसीलदार विजय साळवे हे आयोजित ग्राहकदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहकदिनानिमित्य तहसील कार्यालय मारेगाव येथे ग्राहकदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक हरीप्रसाद पांडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार विजय साळवे होते. यावेळी रास्त भाव दुकानदार, शहरातील व्यवसायिक व प्रतिष्टित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार दिगांबर गोहोकर यांनी तर सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षक नितीन मांडेकर यांनी केले तर आभार नायब तहसीलदार अनमोल कांबळे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.