मंगळवारपासून हेमंत व्याख्यानमालेला सुरूवात

नगर वाचनालयात दोन दिवस व्याख्यानासह ग्रंथ प्रदर्शनी

0

निकेश जिलठे, वणी: उद्यापासून वणीत मंगळवारी हेमंत व्याखानमालेला सुरूवात होत आहे. ही व्याख्यानमाला 22 जानेवारी ते 23 जानेवारी अशा दोन दिवस रंगणार आहे. नगर वाचनालय वणी द्वारा या व्य़ाख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याखानमाला गेल्या 32 वर्षांपासून अखंडपणे सुरू असून हे 33 वं वर्ष आहे. या व्याखानमालेसह ग्रंथप्रदर्शनीचंही आयोजन करण्यात आलं आहे.

मंगळवारी दिनांक 22 जानेवारीला व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध कवयित्री सना पंडित, नागपूर यांचे वर्तनकला या विषयावर व्याख्यान आहे. हे व्याख्यान संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.  या व्याख्यानाचे अध्यक्ष वणीचे तहसिलदार शाम धनमने असणार आहे. हे व्याख्यान निर्मला वामनराव वैद्य परतवाडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंजिरी व सुधीर दामले यांनी प्रायोजित केले आहे. व्याख्यानाआधी 6.45 वाजता सना पंडित यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे.

बुधवारी दिनांक 23 जानेवारी प्राचार्य अरविंद देशमुख, कु-हा यांचे ‘जग सुंदर आहे, अधिक सुंदर करू या’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या व्याख्यानाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, अध्यक्ष शि. प्र. मंडळ हे राहणार आहे. हे व्याख्यान स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती पित्यर्थ विदर्भ साहित्य संघ वणी शाखेद्वारा प्रायोजित केले आहे.

हेमंत व्याख्यानमालेला 32 वर्षांची परंपरा असून या व्याख्यानमालेत नामवंत व्याख्यात्यांनी हजेरी लावली आहे. यावर्षीही नामवंत व्याख्याते या व्याख्यानमालेत येणार आहे. यासोबतच ग्रंथप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.  या दोन्ही कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगर वाचनालयाचे माधव सरपटवार, विशाल झाडे, गजानन कासावार, हरिहर भागवत, तुषार जयस्वाल, रामदास आसेकर, प्राची पाथ्रडकर यांच्यासह वाचनालयाचे कर्मचारी व सदस्य यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.