गणेश मंडळात अनधिकृत वीज कनेक्शन असल्यास सावधान…!

वीज चोरी करणा-या मंडळांवर करणार कार्यवाही - सहा. अभियंता पावडे

0

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लाडके दैवत गणेशाचे आगमन झाले आहे. यावर्षीही घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम आहे. उत्कृष्ट देखावे करण्यासाठी मंडळांनी विविध डेकोरेशन आणि लायटिंग लावली आहे. मात्र अनेक गणेश मंडळात डायरेक्ट पोलवरून आकडे टाकून अवैधरित्या वीज कनेक्शन जोडले जाते. ज्यामुळे अनेक अपघात घडतात. याच अनुषंगाने तालुक्यात असे प्रकार घडू नये याकरिता झरी वीज वितरण कंपनीने रीतसर अर्ज करून अधिकृत लाईनचे कनेक्शन घ्यावे असे आवाहन केले आहे.

तालुक्यात मुकुटबन, घोंसा व पाटण या तीन मुख्य ठिकाणी गणेश मंडळांना अधिकृत कनेक्शनसाठी अर्ज करता येणार आहे. तालुक्यात शेकडो सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना करण्यात आले आहे. अनधिकृत वीज कनेक्शन मुळे गणेश मंडळातील सदस्य सह लहान मूल व भाविकांना धोका होऊ शकतो. तरी अनधिकृत वीज कनेक्शन न लावता अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे असे आवाहन वीज वितरणाचे सहायक अभियंता पावडे यांनी केले आहे.

वीज चोरी विरोधात मोहीम राबवण्यात येणार असून जे गणेश मंडळ वीज चोरी करताना आढळून येईल. अशा मंडळांवर कडक कार्यावही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.