वणीतील अवैध धान्य खरेदी बंद करा

श्री गुरुदेव सेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: शहरात व शहराबाहेर विनापरवाना व्यापारी तैयार झाले असून ठीक ठिकाणी अवैध धान्य खरेदी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी वजनातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट केल्या जात असल्याने सदरचे अवैध खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे निवेदन श्री गुरुदेव सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे एका निवेदनातून केली आहे.

वणीची बाजारपेठ ही धान्य व कापूस खरेदी साठी विदर्भातून मोठी बाजारपेठ असून याठिकाणी दररोज हजारो क्विंटल शेतमालाची वर्दळ असते व हल्ली शेतकरी हा आर्थिक संकटात असल्याने शेतातून निघालेले शेतमाल तात्काळ विकायला आणत आहे. यातच फायदा घेण्यासाठी वणी शहरात व शहरा लगत अनेक विनापरवाना धारक व्यापारी अवैध शेतमाल खरेदी केंद्र उभारून शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे.

शेतमाल मोजणी करतेवेळी ऑटोमॅटिक वजन काट्याचा वापर करीत असून त्यावर रिमोड कंट्रोल ने वजन कमी जास्त करण्याची सेटिंग केलेली आहे . एक क्विंटल मागे जवळपास १५ ते २० किलो वजन कमी केल्या जात असून शेतकऱयांच्या लक्षातच हा प्रकार येऊ देत नाही आहे. एखाद्या शेतकऱ्याने घरूनच मोजून जर माल आणला असेल तरच तो प्रकार लक्षात येत आहे.

काल रविवारी २ डिसेंबर रोजी असाच प्रकार घडल्याने श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शेतकऱ्याला लुटी पासून वाचविले. असा प्रकार दररोज घडत असल्याची शंका नाकारता येत नसल्याने सर्व अवैध धान्य खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून शासनाच्या ज्या विभागवार अवैध धान्य खरेदी केंद्रावर कारवाई करण्यात येते त्या संबंधित अधिकाऱ्याकडून दोन ते तीन दिवसात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, होमदेव कानाके, पुंडलिक मोहितकर, मारोती खापणे, बाळू निखाडे यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.