अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

मांगलीच्या सरपंचांनी पकडला ट्रॅक्टर

0 135

झरी, (सुशिल ओझा): झरी तालुक्यातील मांगली-हिरापूर मार्गावर रॉयल्टी चुकवून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करण्यात आली आहे. अर्धवन येथील विजय करदपवार हा ७ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आपला ट्रॅक्टर (एम, एच ३४,ए पी,२६३९) रेतीने भरून मांगली हिरापुर मार्गाने येत असल्याचे सरपंच नितीन गोरे यांना दिसले. त्यांनी ट्रॅक्टरला थांबवले व लगेच तलाठी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.

तलाठी यांनी ट्रॅकटर व ट्रॉलीचा पंचनामा करून १ ब्रास रेतीवर १४ हजार ५६० रुपये दंड आकारला व ट्रॅकटर सरपंच गोरे यांना सुपूर्त केला. ट्रॅक्टर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवरमध्ये लावण्यात आला व ट्रॅकटर मालकाला नोटीस काढून सरपंचा जवळ दंड भरून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचे म्हटले आहे.

मांगली हिरापुर रेती घाटातून अनेक ट्रॅक्टर दिवस रात्र रेतीची चोरी करीत आहे. अशाही ट्रॅक्टरवर कार्यवाहीसाठी सरपंच यांनी पुढाकार घ्यावा जेणे करून रेती चोरावर आळा बसेल अशी मागणी आता होत आहे.

You might also like More from author

Comments

Loading...