समस्यांच्या प्रशांनी गाजली जिल्हा परिषदेची सभा

संगीता मानकर यांनी केली विविध विकासकामांची मागणी

0 252

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल असून तालुक्यात आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, शासकीय कर्मचारी रिक्त पदे इतर विविध समस्या असून याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु या समास्यांचे निराकरण करण्याकरिता महिला जिल्हा परिषद सदस्य सरसावल्या. जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर यांनी जनरल सभेत अनेक समस्या मांडल्या. तसे निवेदन सुद्धा दिल्याची माहिती आहे.

 

तालुक्यात एकूण अंगणवाड्यांपैकी ५ पदे रिक्त आहे. मदतनीसांची १५ पदे सुद्धा रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्यात यावी.२० मिनी अंगणवाडी बांधकामा करीता निधी उपलब्ध करून देणे .तालुक्यातील वृद्ध कलावंतांना दरमहा मानधन तात्काळ देण्यात यावे, पाटण येथील आरोग्य उपकेंद्रांची तात्काळ दुरुस्ती करून रुग्णांकरिता सर्व सोयी उपलब्ध करून द्यावे. २०१०-११ मधील समाजकल्याण विभागातील शेती साहित्य वाटप करण्यात यावे.

तसेच समाज कल्याण भांडारपालाची बदली होऊनसुद्धा गटविकास अधीकारी यांनी कार्यमुक्त केले नाही. त्यांना त्वरित सोडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर यांनी सभेत केली. त्यावेळी सभेचे अध्यक्ष जि. प. अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल मुख्य कार्यकारी अधिकारी जलद शर्मा उपस्थित होते.

mirchi
Comments
Loading...