शिरपूर येथे कब्बडी सामने थाटात आरंभ

0 254

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिरपूर येथे शनिवारी कब्बडीच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांचे उदघाटन इंदिरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकड़े यांनी केले.

यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, पुढील जीवनात यशस्वी होण्याकरिता व जीवनमान उंचविण्याकरिता काय करावयास हवे. याबाबत आपले मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे उत्तम जीवन जगण्याकरिता आपले कार्य कसे असावयास हवे त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवण्याकरिता मैदानी खेळाचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय निखाडे उपजिल्हा प्रमुख शिवसेना, प्रमुख पाहुने म्हणुन गणपत लेडांगे तालुका प्रमुख शिवसेना, परशुराम पेंदोर.जि.प.सदस्य वणी, ललित लांजेवार शहर प्रमुख युवासेना, सुधीर थेरे सामाजिक नेते ,वर्षा पोतराजे पं.स.सदस्य ,दयालाल अरके, प्रकाश मले , कोम्पेलवा, दीपक पवार पोलिस ठाणेदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

mirchi
Comments
Loading...