काका-पुतण्याकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

मोबाईल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ

0 1,085

सुशील ओझा, झरी: कामाबाबत विचारणा केली असता एका इसमाला काका आणि पुतण्याकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार हिवरा बारसा येथे घडला. 8 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे सदर धमकीचे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा बारसा येथे पांडुरंग आशना भुस्सेवार (४९) हे राहतात. हिवरा येथे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. सदर रोडचे काम पांडुरंग यांच्या घराजवळ चालू असल्याने त्यांनी सचिव सुरेश बोलनेवार यांना रोडच्या कामाबाबत विचारणा केली. यावर सचिव यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले व सदर कामाबाबत कशाला विचारपूस करतो म्हणून सुरेश बोलेनवार यांनी ४ एप्रिल पांडुरंग यांना फोन केला. फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सदर शिवीगाळ करून धमकी दिल्याची रेकॉर्डिंग काही वॉट्सअप ग्रुपवर वायरल झाली.

परिसरात व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगची चर्चा

रेकॉर्डिंग व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. या प्रकाराने काकाची बदनामी झाल्याने सुरेश यांचा पुतण्या सूरज बोलेनवार हा ८ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता लाकडी टेणपा घेऊन फिर्यादीच्या घरी पोहोचला. तिथे दरवाज्याला लाथा मारत त्याने बाहेर निघा तुम्हाला खतम करतो अशी धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. झालेल्या प्रकारावरून पांडुरंग घाबरले. त्यांनी पाटण पोलीस स्टेशन गाठून जिवाचा धोका निर्माण झाल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी भादंवी कलम २९४,५०६,५०७,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेश येलपुलवार करीत आहे.

mirchi
Comments
Loading...