झरी तालुक्यात दादासाहेब कन्नमवार जयंती साजरी

0 150

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कर्मवीर  मा.सा.दादासाहेब कन्नमवार (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री) यांची  ११८ वी जयंती (दि.१०) बुधवारला मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.बेलदार समाज बांधव जिथे जिथे  आहे त्या त्या ठिकाणी जयंती करुन कर्मवीर  मा.सा.कन्नमवार यांच्याप्रती समाजात प्रेम आहे हे दाखवीण्यात आले.

मुकुटबन येथे ग्राम पंचायत मुकुटबन कार्यालयात सरपंच शंकर लाकडे यानी प्रतीमेला हार अर्पण केले. ह्यावेळी  उपसरपंच आगुलवार, बापूराव पुल्लीवार, नागेश अक्केवार, चिट्ट्लवार गुरुजी, आगुलवार गुरुजी, बाजनलावार व इतर मान्यवर उपस्थित होते. मांडवी येथे बेलदार समाज भवनात सकाळी 8 वाजता गावात  प्रभातफेरी काढण्यात आली व विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सतपल्ली येथे जि.प.शाळेत सकाळी ८:३० वाजता पाटणबोरी येथे बेलदार समाज मंदीर येथे सकाळी १०  वाजता व चालबर्डी इत्यादी ठिकाणी मोठया उत्साहात कन्नमवार जयंती साजरी करण्यात आली.

You might also like More from author

Comments

Loading...