खर्रा उधार न दिल्याने पानटपरीचालकावर हल्ला

पानटपरीचालकांनो उधार देताना सावधान....!

0

बहुगुणी डेस्क: फक्त खर्रा उधार न दिला या शुल्लक कारणावरून एका व्यक्तीने पानटपरी चालकावर हल्ला केला आहे. शुक्रवारी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा इथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

वाठोड्यामध्ये सूरज आडे हा पानटपरी चालवून त्याचा उदरनिर्वाह करतो. त्याच गावात हुसेन आत्राम हा तरुण राहतो. त्याची सूरजच्या पानटपरीवर उधारी होती. मात्र काही दिवसांपासून त्याची उधारी थकली होती. शुक्रवारी हुसेन सूरजकडे उधारीवर खर्रा घेण्यास गेला. मात्र आधीची उधारी चुकवली नसल्याने सूरजने हुसेनला खर्रा देण्यास नकार दिला.

खर्रा न दिल्याने संतापलेल्या सूरजला मारहाण करत त्याच्यावर विळ्याने हल्ला केला. त्यात सूरज जखमी झाला. याप्ररकणी सूरजने पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी हुसेन आत्रामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.