शुल्लक कारणावरून चाकूने हल्ला

0 573

वणी, विवेक तोटेवार; वणीतील सनी बारच्या बाजूला मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शुल्लक कारणावरून एका इसमाने चाकूने हल्ला करून एकास गंभीर जखमीं केल्याचे वृत्त आहे.

फिर्यादी विकास उत्तम वाईकर हे सनी बारच्या बाजूला अंड्याचा व्यवसाय करतात. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे चार वाजताच्या सुमारास आपला भाऊ ज्ञानेश्वर उत्तम वाईकर (32) यांना दुकानावर बसवून जेवण करण्यास गेले. साडेचार वाजता जेव्हा विकास दुकानावर आला तेव्हा ज्ञानेश्वर याने सांगितले की, आरोपी शेख खलील शेख फरीद रंगनाथ नगर (32) हा दुकानावर आला होता. त्याने आम्लेटचा ऑर्डर दिला त्यानंतर मी आम्लेट दिल्यानंतर त्याला पैसाची मागणी केली असता त्याने कशाचे पैसे म्हणून वाद घातला व लाथा बुक्यांनी मारहाण केली.

त्यानंतर नेहमीप्रमाणे साडेदहा वाजतापर्यंत ज्ञानेश्वर दुकानावर होता.विकास आला असता त्याला माहित पडले की, ज्ञानेश्वर याच्यावर हल्ला झाला आहे. विकास व त्याचे मित्र त्वरित वणीतील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. विचारणा केली असता ज्ञानेश्वरने सांगितले की आरोपी शेख खलील याला वाद का घातला म्हणून विचारणा केली असता त्याने माझ्यावर चाकूने हमला केला.

ज्यात ज्ञानेश्वर याच्या डाव्या व उजव्या डोळ्याच्या वर जखम झाली आहे. दीपक चौपाटीवर काही लोकांनी ज्ञानेश्वर याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.विकास याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख खलील याच्यावर कलम 326 ,504 नुसार गुन्हा नोंद केला आहे.घटनेचा पुढील तपास पो हे का आनंद अलचेवार करीत आहे.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...