मृतांमध्ये वणीतील सहा जणांचा समावेश

0

विलास ताजने, वणी: कोरपना येथून जवळ असलेल्या हेटी गावाजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आता 11 वर पोहोचला असून यात वणीतील 6 जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. यात काळीपिवळी चालक सुजित बाळू टावरे हा लालगुडा येथील रहिवाशी आहे.

रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान महागाव आणि वणी येथील मजूर हे जिनिंगमध्ये काम करून एमएचटी 29-8582 या क्रमांकाची काळीपिवळी (मॅजिक) या गाडीने वणीकडे परतत होते. या वाहनात एकूण 15 प्रवासी होते तर याच वेळी ट्रक एमएचटी 29-1683 हा कोरपनाकडे येत होता.

हेटी गावाजवळ आल्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या काळीपिवळीला धडकला. ही धडक एवढी जोरात होती की काळीपिवळीचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळीच 11 प्रवाशांचा मृत्यू झाला.

यात चालकासह वणीतील सहा जणांचा समावेश आहे. 

मृतक नावे-1) शोभा सुभाष निब्रड, वणी 2)सुजीत बाळू डवरे ,लालगुडा वणी 3)वनिता गजानन नवघरे  उटी त. महागाव 4)कुसुम अशोक हटकर,माळवांगद महागाव 5)पावर्ती कैलास गेडाम वणी 6)छाया दादाजी लोहकरे वणी 7)क्रिष अशोक हट कर 8)हातूनबि हमिद खा पठान वणी 9) संगीता दिनेश टेकाम वणी 10)अमोल दगडू हटकर 11) गजानन कोंडबा नवघरे ऊटी

जखमी 1)देवानंद अशोक हट कर 2)गोलू सुरेश दुर्गे
3)आदित्य गजानन नवघरे

मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चार जण गंभीर जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात वणीतील सहा जणांचा समावेश असल्याने वणीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.