अबब !  कुरई येथे पुन्हा अवैध दारू विक्री

आरोपी पुरुषांसह महिलांना घेतले ताब्यात

0 1,359

विलास ताजने, वणी :  अवैध दारू विक्रेत्यांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना दि.११ सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. तर काही आरोपी पोलिस येण्याचा सुगावा लागताच पळून गेले. सदर घटनेमुळे अवैध दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढल्याचे दिसून येते. कुरई येथे अवैध दारू तस्करांनी महिलांना मारहाण केल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा गावात दारू विक्री सुरू झाल्याचे दिसून येते. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील दारू विक्रीचा सुगावा ग्रामस्थांनी शिरपूर पोलिसांना दिला. पोलिसांनी संशयिताच्या घराची झडती घेतली असता बारा हजार रुपये किंमतीचा दारूसाठा आढळून आला. संशयिताच्या घराची झडती घेतांना दारू विक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांना तीव्र विरोध केला. मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपी देवराव चव्हाण, सौरभ चव्हाण, कल्पना गणपत खिराटकर, सुमित गणपत खिरटकर, शेख इब्राहिम आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तपास जमादार विजय मोडक आणि सहकारी पोलिस करीत आहे.

लिंक वर क्लिक करून पाहा व्हिडिओ

mirchi
Comments
Loading...