लाठी-भालर वसाहत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

राष्ट्रवादीच्या पौर्णिमा संतोष भोंगळे सरपंचपदी

0 1,284

विवेक तोटेवार, वणी: लाठी-भालर वसाहत या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पौर्णिमा संतोष भोंगळे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी योगिता मोहाडे यांचा दणदणीत पराभव केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकर यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढवण्यात आली होती.

3 डिसेंबरला लाठी-भालर वसाहत इथे संरपंचपदाची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीच्या पौर्णिमा भोंगळे यांना सात तर योगिता मोहाडे यांना तीन मते मिळाली. विजयी होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा विजयोत्सव साजरा केला.

अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित सरपंचांची भेट घेतली. पौर्णिमा भोंगळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लोकांनी संधी दिली त्याचे सोने करेल आणि गाव सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पौर्णिमा भोंगळे यांनी बोलताना दिली.

यावेळी डॉ. लोढा म्हणाले की परिसरात राष्ट्रवादीची सूत्रे घेऊन खूप काळ लोटला नसला तरी आमच्या कार्यामुळे जनसामान्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे अलिकडे झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळत आहे. लोक कामाची पावती देत आहे व याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीतही दिसून येणार.

या कार्यक्रमात जयसिंग गोहोकर, महेश पिदूरकर, मारोती मोहाडे, संगीताताई खटोड, स्वप्निल धुर्वे, संतोष भोंगळे, सूर्यकांत खाडे, अंकुश मापूर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

mirchi
Comments
Loading...