महावितरणला ग्राहकाभिमुख करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नवीन बदल स्वीकारणे गरजेचे – अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे

बिलींगच्या ऑनलाईन तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळाचे आयोजन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: वीजबिल दुरूस्ती संबंधित  आलेल्या ऑनलाईन तक्रारींची दिलेल्या वेळत दखल घेण्यासाठी, तसेच बिलांसंदर्भात तक्रारच निर्माण होऊ नये यासाठी  बिलींग विभागाशी संबंधितच नाही तर महावितरणमधील सर्वांनीच ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्यवस्थापनांकडून ज्याप्रमाणे नवनवीन पाऊले उचलली जात आहे त्याला अनुसरून कर्मचाऱ्यांना  चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांनी केले . तर ,राज्याची वाटचाल डिजीटलकडे होत असताना महावितरण कर्मचाऱ्यांनीही नवीन बदल आत्मसात करून आपले योगदान देण्याचे आवाहन  कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे यांनी केले.

महावितरणने नुकत्याच जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार , वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे.  तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येणार असल्याने, त्या अनुशंगाने  अधीक्षक अभियंता माहुरे यांच्या मार्गदर्शनात आणि वरीष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा विश्वनाथ कटृटा यांच्या पुढाकाराने  ही कार्यशाळा घेण्यात आली होती .

 

बिलिंगमध्ये पीसी धारकांची व सहायक लेखापाल यांची भूमिका किती महत्वाची आहेपरिपत्रकानुसार काम कसे करायचे? व्यवस्थापनाला अपेक्षित परिणाम देण्यासाठी काय काय खबरदारी घेतली  पाहिजे?

 

 

उपविभागीय अधिकारी यांना वेळोवेळी बिलिंग  मधील अनियमितता  लक्षात का    आणून द्यावी?, बिल दुरुस्ती हा एक आजार असून तो कसा टाळता येईल ? बिलिंग प्रणालीमध्ये झालेले बदल? , M30 चे व्हॅलीडेशन कसेकरायचे ? रिव्हर्स रिडींग असलेल्या ग्राहकांचे स्थळ परीक्षण अहवाल का  आवश्यक आहे ? अशा अनेक विषयांवर उपव्यवस्थापक  वित्त व लेखा विकास बांबल यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेचे आयोजन वित्त व लेखा  व्यवस्थापक प्रमोद चव्हाण यांनी केले होते. या कार्यशाळेला बिलींगशी संबंधीत महावितरणचे जिल्हयातील सर्व उपव्यवस्थापक, सर्व पी.सी.धारकासह सहाय्यक लेखापाल प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.