वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच, परिसरात विविध तर्क वितर्कांना ऊत

0

वणी: वणी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर वसाहतीत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचं नाव गजानन बापुराव भोयर आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्या असलं तरी या घटने संदर्भात वसाहतीत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

परिसरात चर्चा आहे की कौटुंबीक वादतून ही आत्महत्या करण्यात आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेकोलीत शेती गेल्याने अहेरी येथील तरुणी वेकोलीत कामावर रुजू झाली. दरम्यान तिचा विवाह याआधी झाला होता. पण काही काळातच तिचा घटस्फोट झाला असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं. त्यानंतर वेकोलीत कामावर असलेल्या तरुणीचा विवाह चंद्रपूर जिल्ह्यातील शेणगाव येथील गजानन बापूराव भोयर या तरुणाशी झाला. गजाननची पत्नी वेकोलीत कामावर असल्याने तिला वेकोली वसाहतीत निवासस्थान मिळाले.

दोघेही तेथेच राहू लागले. वेकोलीत कामावर असलेल्या गजाननच्या पत्नीचे व गजाननचे खटके उडत असल्याची कुरबुर वसाहतीत ऐकायला आली. तसंच घटनेच्या दिवसी गुरुवारला रात्री दोघांमध्ये वाद सुद्धा झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गजाननची पत्नी रात्रीच घराबाहेर पडली. ती सकाळी परत आली तेव्हा गजानन गळफास लावून मृत अवस्थेत असल्याचं दिसलं. गजाननच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

(वणी कृषी उत्पन्न बाजार समिती होणार ऑनलाईन)

सध्या या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सागर इंगोले यांचे मार्गदर्शनात पीएसआय योगेश दंदे करीत आहे. गजानन ने आत्महत्या का केली ? पत्नी इतक्या रात्री बाहेर का गेली ?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तूर्तास या घटनेतील नेमकं कारण पोलीस तपासात उघड होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.