विकास निधी उपलब्ध, पण मंजुरीच्या चक्रव्यहात

नगर विकास मंत्रालयाकडुन मिळालेले तीन कोटी खर्च नाही

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतला सव्वादोन वर्ष उलटले. सत्ताधारी भाजपा आणि एका अपक्षाच्या मदतीने सत्तेचा गाडा चालवत असताना मारेगाव शहर विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुरूवातीला घनकचर्याचे कंत्राट बोगस कंत्राटदाराला दिल्याने विरोधी नगरसेवक व गावकऱ्यांनी  नगरपंचायतची चक्क आंदोलनाच्या माध्यमातून प्रतीकात्मक चौदावीचा कार्यक्रम ठेऊन सत्ताधाऱ्यांप्रती चिड व्यक्त केली.

मारेगाव नगरपंचायत सतरा सदस्यीय असुन अल्पमतात आलेल्या शिवसेनेने सत्तेचा सारिपाट मांडन्यासाठी भाजपाचे तीन नगरसेवक व एका अपक्ष नगरसेविकेच्या माध्यमातून नगरपंचायतचे सिंहासन हस्तगत केले. सत्ताधाऱ्यांचा हा कालावधी चुटुकबुटुक निधीतून केवळ पावसाळ्यातील रस्त्यांची थातुर मातुर डागडुजी करण्यात गेला. मारेगाव शहराच्या विकास बाजुलाच राहिला. नगरविकास मंत्रालयाकडुन मिळालेला तीन कोटींचा विकास निधी  सार्वजनिक बांधकाम विभागाकडे  वळता झाला, त्यामुळे नगरपंचायत मधील नगरसेवक व सत्ताधारी यांनी त्या तीन कोटी रुपयांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी  प्रयत्न केले असल्याचे सत्ताधारी सांगत असले, तरी मग तो निधी का वापरण्यात आला नाही हा प्रश्न शहरवासियाना पडला अाहे. त्या निधीतून विकास का झाला नाही, कारण त्या निधीच्या कामातून कमिशन मिळन्याची आशा नसल्याने त्या तिन कोटी रुपये पडून असल्याच शहरवासियाच म्हणन आहे,

आज घडीला मारेगाव शहरात शौचालयाची बरेच कामे झाली असून परंतु शहरात पाणी वाहून नेण्याच्या नाल्याची वानवा असल्याने सांडपाणी बाहेर जात नाही. अनेक कुटुंबाकडे शोष खड्ड्याची सोय नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येऊन आरोग्याचा प्रश्न उद्भवु शकतो.

शहरातील अनेक प्रभागात नगरपंचायतच्या अकार्यक्षम वृतीने रस्त्याची कामे ठप्प असल्याने शहरवासियांची कुरकुर चालु असुन, त्यातच जानेवारी महिन्यात पाणी पातळी खाली जाण्याचा कारणाने नगरपंचायत प्रशासनाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते.

नगरपंचायतीला दोन कोटी रुपयांचा निधी आल्याचे बोलले जात असुन तो निधी नवीन नगरपंचायतची वास्तू बनवण्यासाठी वापरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नगरपंचायत मधे स्थायी समितीच्या माध्यमातून अनेक विभागाचे सभापती पदे निर्माण केल्या जाते, परंतु या नगरपंचायतची दुसरी स्थायी समिती निर्माण झाली. फक्त ह्या स्थायी समितीत पदे असते, पण कोणते कामे या स्थायी समितीच्या माध्यमातून केल्या गेली हे अजूनही मारेगाव कराना माहित नाही असे बोलले जात आहे.

सव्वादोन वर्षाच्या कारकीर्दीला मारेगावकर नाखुश असल्याने, फक्त येथील सभासदांना विधानपरिषद निवडुकीतुन मोठा लाभ झाला. असे असले तरी शहरवासियाची नगरपंचायत प्रशासनाने उरलेल्या दोन अडिच वर्षात विकासाची कामे करावी असी माफक अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.