टाकळी (कुंभा) येथे विवाहित महिलेची आत्महत्या

0 691

रोहण आदेवार, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी येथे दि. 19 सप्टेंबर बुधवारी एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिच्या घरच्या शेतातील विहिरीत तिचे शव आढळून आले.

टाकळी येथे सुरेखा गजानन ठोंबरे (32) ही महिला दुपारी 3 वाजता शेतात गेली. संध्याकाळ झाली तरी ती शेतातून परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. घरच्या लोकांनी तसेच गावातल्या लोकांनी गावशेजारील शेत शिवारात तिला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरेखाचा पत्ता लागला नाही.

अखेर गावातील लोकांना तिचे शव त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीत आढळून आले. गावातील लोकांनी या घटनेची गावात दिली असता पोलीस पाटील संगीता राजु आदेवार व मारोती ठोंबरे यांनी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. सुरेखाला पती तसेच दोन अपत्य आहे. गर्भ पिशवीच्या आजाराने ती तस्त असल्याची माहिती समोर येत आहे.

mirchi
Comments
Loading...