ग्रामविकास अधिकारी कलेक्टरला दिलेले वचन पाळतील का ?

माथार्जून २६ जानेवारी पर्यंत हागणदारी मुक्त होणार ?

0

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील माथार्जुन ग्रामपंचायतीला ४ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी भवनेश्वरी देवी, तहसीलदार गणेश राउत, मंडळ अधिकारी भोयर व चांदेकर यांनी माथार्जुन ग्रा पं ला भेट देऊन माथार्जुन येथील तालुक्यातील पहीले एटीएम वॉटर प्लांटची पाहणी केली. तसेच विकास कामाचा आढावा घेउन जिल्हाधिकारी यांनी विजय उइके यांना माथार्जुन गाव हागणदारी मुक्त करण्यास किती वेळ लागेल ह्यावर २६ जानेवारी पर्यंत हागणदारी मुक्त करु अशी ग्वाही दिली. आता ग्रामविकास अधिकारी हे वचन पाळतये का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गामविकास अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे चार ग्रामपंचायतीचा पदभार असुन त्यांनी दाभाडी लोकसंख्या ११८३ ग्रापंचा पदभार डिसेंबर २०१६ मध्ये घेतला. मांगुर्ला लोकसंख्या ८३४ ग्रापंचा पदभार जुलै २०१७ मध्ये घेतला. हे दोन्ही गाव १०० टक्के हागणदारीमुक्त केले. पाटण लोकसंख्या 3992 ग्रापंचा पदभार ५ जानेवारी २०१८ मध्ये घेतला तर माथार्जुन ग्रांपंचायतीचा पदभार ऑगस्ट २०१७ ला घेतला असुन हे गाव ७० टक्के हागनदारी मुक्त आहे.

हागनदारी मुक्ती साठी पाटण मधे १६४ संडास व माथार्जुन मधे १२७ संडास बांधकामासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. विजय उईके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गावातील सर्व पदाधीकारी सर्व अधिकारी शिक्षक विद्यार्थी व समस्त गावकऱ्यांनी माथार्जुन गाव २६ जानेवारी २०१८ पर्यत हागनदरी मुक्त झालाच पाहिजे यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहे.

पाटण येथील सरपंच हललवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परीषद शिक्षक व रामलु आईटवार व माथार्जुन गावातील सरपंच बाबुलाल किनाके, ग्रा वि अ विजय उईके, उपसरपंच संतोष जंगीलवार, पो पाटील प्रकाश गेडाम, तंटा मुक्त समीती अध्यक्ष शरीफ शेख, ग्राम पंचायत सदस्य पुंजाराम मेश्राम राधाबाई किनाके फुलाबाई मेश्राम प्रियंका बासावार दादाराव मेश्राम कोबाई टेकाम गिजाबाई आत्राम आरोग्य कर्मचारी आशा वर्कर प्रत्ती दिवशी मार्गदशन करीत असुन विजय उईकेच्या प्रयत्नांना यश मिळेल यात काही शंका नाही .

ह्यापुर्वी दाभाडी व मांगुर्ला ही गावे १०० टक्के हागनदारी मुक्त केले त्यामुळे तेथील अनुभव असल्यामुळे माथार्जुन गावात ७० % शौचालय लंय पुर्ण झाले उर्वेरीत ३० % शौचालय २६ जानेवारी पर्यंत पुर्ण करू व ह्या कार्यात मला ग्रामवासियांचे, गावातील पदाधिकाऱ्यांचे सहयोग व गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण व शिवाजी गवई यांचे सतत मार्गदर्शन असल्यामुळे १०० टक्के गाव हागनदारी मुक्त करु :- विजय उईके ग्राम विकास अधिकारी 

Leave A Reply

Your email address will not be published.