मेंढोली येथे वृद्धाची फाशी घेऊन आत्महत्या

गेल्या वर्षी मृतकाच्या पत्नीची व अविवाहित मुलीची आत्महत्या

0 1,879

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथे एका शेतमजूराने शेतात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१४ मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्णू चिकराम (वय ७५)असे मृतकाचे नाव आहे.

शिरपूर रोडलगत वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण करून ते शेती करीत होते. त्याच शेतात ऐनाच्या झाडाला दोराने फाशी लागलेला मृतदेह आढळुन आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. विशेष म्हणजे मागील वर्षी मृतकाच्या पत्नीने आणि अविवाहित मुलीने एकाच वेळी विष प्राशन करून जीवन संपविले होते.

मृतकाच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मृतकाच्या मुलानी शिरपूर पोलिसाना दिली आहे. शिरपूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

mirchi
Comments
Loading...