झरी येथे मिस्त्री प्रशिक्षण

0

सुशील ओझा, झरी: आरडीओ ट्रस्ट फिनीश सोसायटी तर्फे येथील समाजमंदिरात मिस्त्री प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. झरी शहरात गेल्या दहा महिन्यांपासून हागणदारीमुक्त परिसर व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत संस्था व मोटिवेटर यांच्या माध्यमातून शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी मिस्त्री प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात मि्त्रिरंना तांत्रिक व कमी खर्चात आणि स्वच्छ भारत मिशनच्या निर्देशानानुसार कशाप्रकारे बांधकाम केले जाते. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शहर हागणदारीमुक्त, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपणाबाबत माहिती देण्यात आली. या शिबिरात १०२ कारागीर सहभागी होते. त्यांना फिनिश सोसायटीचे प्रकल्प समन्वयक श्रीकांत राठोड यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला प्रमोद यवतकार, अध्यक्ष राजूमोहितकर, चंद्रकांत पवार प्रियंका परचाके, रवी कोरवते व राहूल प्रधान उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.