महावितरणाच्या भरारी पथकाने केली 42 लाख रुपयांची वसुली

0 1,113

विवेक तोटेवार, वणी: महावितरणच्या भरारी पथकाने वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती आहे. लाईट बिल कमी आले पाहिजे म्हणून मीटरमध्ये सेटिंग करून ठेवलेल्या जवळपास 49 लोकांवर महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

महावितरणचे भरारी पथक हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी वणीत दाखल झाले. ज्यामध्ये गोंदिया, नागपूर शहर व ग्रामीण, गडचिरोली, चंद्रपूर येथील पथकांनी वणीतील विविध ठिकाणी धाडी टाकून 49 वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली.

ज्यामधून महावितरणने 41.92 लाख रुपयांचा दंड वसुल केला. माहितीनुसार काही जणांवर 2 ते 3 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी दंडाचा भरणा केला नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...