दोन तरुणांमुळे दुर्मिळ पक्षी घुबडाला जीवनदान

जखमी अवस्थेत आढळला होता पक्षी

0

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे दोन तरुणांनी घुबडाला जीवनदान दिले. हे घुबड जखमी अवस्थेत संध्याकाळी मुकुटबनमध्ये आढळले होते. पक्षाचे पंख जळालेले होते. या वेळी कुणाला काय करावे हे सुचत नव्हते अशा वेळी या पक्षाला जीवनदान देण्यासाठी दोन तरुण सरसावले. त्यांच्या प्रसंगवधानामुळे पक्षाला जीवनदान मिळाले आहे.

संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रुपेश शेकबंडीवार यांच्या अंगणात जखमी घुबड हा पक्षी उडत आला. याची माहिती गावातील योगेश गणपत बच्चेवार आणि प्रियल चिंतामण पथाडे या दोन तरुणांना मिळाली. माहिती मिळताच यांनी घटनास्थळी जाऊन त्या घुबडाला पकडले आणि मुकूटबन वनविभागात जाऊन तेथे त्या पक्षीला वनविभागाकडे सुपूर्द केले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वि जी वारे, ए. एस. कुडमेथे वनरक्षक, डी. डी. पाचभाई वनरक्षक, पि. यु. भोसले वनरक्षक, एस. डी. कुरडे वनरक्षक उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी वारे यांनी घुबडावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. पशुवैद्यकीय अधिकारी अवधुत देवकर यांनी घुबडावर प्रथमोपचार केले. घुबडाला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने पंख जळाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.