अखेर मुकुटबन-यवतमाळ रात्रकालीन बस सुरू

स्थानिकांच्या लढ्याला अखेर यश

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, कॉलेज, रुग्णालय, खासगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावी लागते. मुकुटबनवरून पांढरकवडा आगाराची मुकुटबन-यवतमाळ ही रात्रकालीन बस बस गेल्या २० वर्षांपासून. परंतु गेल्या महिन्यात ही बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुकुटबन ला येण्याकरिता व मुकुटबन ते यवतमाळ जाण्याकरिता एकही बस नसल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

शासकीय बस अचानक बंद केल्याने पांढरकवडा आगराबाबत प्रवाश्यात मोठी नाराजी व्यक्त केल्या जात होती. शासकीय बस बंद झाल्याने पांढरकवडा ते पाटणबोरी, पाटण मुकुटबन मार्गावरील शेकडो लोकांची हाल सुरू होते. ही बस मुकुटबनहून यवतमाळ करीता दररोज सकाळी ६.१५ वाजता निघते व या मार्गावरील पाटण, सुरदापुर, कमळवेळी, सतपल्ली, दाभा या गावातील शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या बसचा उपयोग शाळेत जाण्याकरीता करतात. परंतु सदर बस बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला होता.

वर्ग ५ ते ९ वि पर्यंतच्या विद्यर्थांचे परीक्षा काळातच बस बंद झाल्याने पेपर सुद्धा वेळेवर देने कठीण झाले होते. रात्रकालीन बसने पहाटे ६ वाजता जाणे व सायंकाळी ९ वाजेपर्यंत शासकीय, खाजगी व इतर कामे करून जनता घरी परत येत होती. परंतु रात्रकालीन बस बंद झाल्याने यवतमाळ वणी व पांढकवडया वरून मुकुटबन पर्यंत यायला एकही बस नसल्याने प्रवाशांना पांढरकवडा किंवा वणी येथे मुक्काम करून आर्थिक भुदंड सोसावे लागत होता.

यवतमाळ- मुकुटबन रात्रकालीन बस त्वरित सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, व्यापारी व कर्मचारी वर्गातून होत होती. वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलनेही हा विषय उचलून याबाबत बातम्या प्रकाशित केल्या होत्या. तसेच एक सामाजिक संघटना व गावातील काही तरुण बससेवा सुरू करण्यासाठी पुढे सरसावले व पांढरकवडा आगारात निवेदने देऊऩ बससेवा सुरू करण्याची मागणी केली. परंतु आगार प्रमुखकाडून वाहक व चालकांना मुकुटबन येथे राहण्याकरिता झोपण्याकरिता रुम व शौचालय नसल्याचे कारण पुढे करून बस बंद केल्याचे सांगण्यात आले होते.

शासन निर्णयानुसार मुकुटबन येते रात्रकालीन बसच्या वाहक व चालकाकरिता ग्रामपंचायतने गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी रुम, संडास बाथरूम, नळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाहक व चालकाच्या खोट्या माहिती वरून बस बंद करण्याचा प्रताप पांढरकवडा आगार प्रमुख यांनी केल्याचा आरोप सरपंच शंकर लाकडे यांनी केला. २२ एप्रिलच्या रात्री यवतमाळ मुकुटबन बस मुकुटबनला रात्री आली त्या गाडीतच आगार प्रमुख आले होते.

त्यावेळेस शेकडो जनतेसमोर सरपंच यांनी आगार प्रमुख यांना चालक वाहकाकरिता बांधलेली रूम, संडास, बाथरूम, पाण्याची व्यवस्था असल्याचे दाखवून दिले. यावरून आगार प्रमुख थक्क झाले. ग्रामपंचायतच्या व्यवस्थेबाबत विचारण्यापेक्षा आपल्या वाहक व चालकचे कारनामे पहा तुम्हीच खाजगी बस सुरू रहावी याकरिता तुम्ही केलेले नाटक असल्याचे शेकडो तरुणांसमोर ठणकावून सरपंच शंकर लाकडे यानी आगार प्रमुखांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.