वणीत नाभिक समाजाचा विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा      

समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

0 361

सुरेंद्र इखारे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई शाखा यवतमाळ वणीच्या वतीने  दिनांक 16/02/2019 रोज शनिवरला शेतकरी मंदिर वणी येथे दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत  विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे.

या नाभिक समाजाच्या वधुवर परिचय मेळाव्यात वर्ग 10 वि  व 12  वि मध्ये 80% गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा  परिषद , पंचायत समिती , नगर परिषद व ग्राम पंचायत समिती मध्ये निवडून येणाऱ्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

समाज बांधवांनी या विदर्भस्तरीय  वधुवर परिचय मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षीने ,निखिल मांडवकर , सागर वाटेकर, बंटी खटले, प्रभाकर कडुकर, जितेंद्र घुमे , विनोद धबेकर, बाळू कडुकर, स्वप्नील दरवे , बालाजी नागतुरे, मंगल चौधरी , निकेश कडुकर, बबन वाटेकर, सुभाष नक्षीने, केशव नक्षीने, प्रशांत नागतुरे, दिलीप वनकर, अभय नागतुरे, लक्ष्मण नक्षीने, अजय हनुमंते, गणेश मांडवकर, चंदू नक्षीने, मारोती मांडवकर, सचिन धबेकर ,  अविनाश नक्षीने, सचिन हणमंते, योगेश मांडवकर ,मोहन नागतुरे, विनोद कडुकर, यांनी केले.

mirchi
Comments
Loading...