५०४ शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे ३ कोटी ६१ लाख रुपये थकीत

0

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने नाफेड मार्फत तुरी खरेदीचा शुभारंभ १६ फेबुवारी पासून करण्यात आला होता. परंतु सन २०१८-२०१९ मध्ये नाफेड मार्फत तूर खरेदी करून आजपर्यंत या एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप होतोय. झरी तालुक्यात ५०४ शेतकऱ्यांकडून ६ हजार ६९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

एकाही शेतकऱ्याला रुपयाही न मिळाल्याने शेतकऱ्यांना आपले जुने बँक, सोसायटीचे कर्ज ३१ मार्चच्या आत परतफेड करावे लागते आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतच्या कर्जाला व्याजावर सूट असते तर १ लाखपर्यंतच्या रकमेवर २% व्याज लागते. परंतु शासनाने अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसा जमा न केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ३१ मार्चनंतर बँकेचे कर्ज परतफेड करून बँक कर्ज काढल्यास १४% व्याजावर कर्ज काढावे लागेल या चिंतेत शेतकरी सापडला आहे. हा भुर्दंड कोण सोसणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा झाला आहे.

याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरिता तालुका युवक काँग्रेस व तालुका काँग्रेस पार्टी पुढे आली असून वरील समस्या त्वरित न सोडवल्यास १९ मार्च ला मुकुटबन येथील बुसस्टँड वर दुपारी १२ वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या  निवेदनातून करण्यात आला आहे. त्यावेळी राजीव एल्टीवार जिल्हा उपाध्यक्ष, भूमारेड्डी बाजनलावार तालुका अध्यक्ष, राजीव कासावार वणी विधानसभा युवक अध्यक्ष, संदीप बुरेवार कृषी उत्पन्न बाजार, मिथुन सोयम माजी सभापती प.स, संचालक कृ उ बाजार समिती संजय भोयर, बळी पेंदोर, बाबूलाल किनाके, अरविंद यनगंटीवार तसेच भूमारेड्डी एनपोतुलवार, चंद्रशेखर बोनगिरवार, कालिदास अर्क, प्रशांत अरके, सचिन अर्क, राहुल धंडेकर सह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत वणी बहुगुणीशी बोलताना संदीप बुरेवार म्हणाले की… मी डीमओ साहेबांशी शेतकऱ्यांच्या तुरीच्या पेमेंट बाबत अनेकदा बोललो पेमेंट आज काढतो उद्या काढतो असे म्हणत उडवाउडवीचे उत्तर मिळत होते ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ माझ्या वरिष्ठ पदाधिकारी सह रास्ता रोको करण्यास उतरलो. – संदीप बुरेवार — सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी

Leave A Reply

Your email address will not be published.