लाच घेताना नगर पालिकेचे दोन कर्मचारी अटकेत

मध्यस्थी करणारा व्यक्तीलाही अटक

0

वणी(रवि ढुमणे): वणी नगर पालिकेत कंत्राटदार असलेल्या महिलेला कामाची देयके काढण्यासाठी लाच घेणाऱ्या नगर पालिकेतील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.  तर मध्यस्थी करून पैसे घेणारा इसमही अडकला आहे.

वणी नगर पालिकेतील आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागात गेल्या काही वर्षांपासून एका महिला कंत्राटदारांची देयके थकीत होती.  देयकाची रक्कम काढून देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी काशिनाथ काकडे 50 व संगणक अभियंता बालाजी टोपाजी 27    प्रत्येकी 4 ते 5 हजार रुपयांची मागणी केली.  ठरल्याप्रमाणे द्यायची ठरली. आणि संबंधित महिलेच्या तक्रारीवरून एसीबीने जाळे रचले ,बाकडे पेट्रोल पपंजवळील एका टायर दुरुस्तीच्या दुकानात लाच घेताना दोघांनाही रंगेहाथ पकडल्याची माहिती पुढे आली आहे. यात मध्यस्थीची भूमिका वठविणारा  सुनील पारखी 49 हा खाजगी इसमही पैसे घेतांना रंगेहाथ पकडल्या गेला आहे. देयके काढणे व पुढील कामात मदत करणे यासाठी रकमेची मागणी केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
 सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,उपअधीक्षक आर बी मुळे,यांचे मार्गदर्शनात निरीक्षक नितीन, लेव्हरकर ,निलेश पखाले,मिलिंद गोफणे,किरण खेडकर,अनिल राजकुमार, भारत चिरडे,महेश वाकोडे सचिन भोयर आदींनी केली आहे. संबंधितांना एकूण नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.