पाटण सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे

गैरप्रकारामुळे सरपंच झाले होते अपात्र

0

सुशील ओझा, झरी: पाटण ग्रामपंचायत सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे सोपविण्यात आला आहे. सरपंचांना अपात्र ठरविण्यात आल्याने रिक्तपदाचा प्रभार उपसरपंचाकडे देण्यात आला आहे, तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतमध्ये सरपंच रमेश हललवार व उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांनी परस्पराविरुद्ध तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय अमरावतीपयंर्त अफरातफर व इतर तक्रारी करण्यात आल्या.

उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांनी यापूर्वी ग्रामपंचायतच्या दोन सदस्याविरुद्ध आपत्रतेकरिता केस दाखल करून दोन्ही सदस्य अपात्र केले. त्यानंतर सरपंच हललवार यांच्या विरुद्ध विभागीय आयुक्त अमरावती येथे गावातील विविध विकास कामात गैरप्रकार केले व पदाचा दुरुपयोग केल्याची अपील दाखल केली होती.

त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त अमरावती यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) अंतर्गत सरपंच रमेश हललवार यांनाही नुकतेच अपात्र केले. त्यांच्या जागेवर उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांना सरपंचपदाचा प्रभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांनी दोन सदस्य व सरपंच यांना अपात्र केल्याची घटना जिल्ह्यातील पहिलीच असल्याचे बोलले जात आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.