पाथ्री येथील फ़िल्टर प्लांट बनले शोभेची वास्तू

ग्रामस्थांना वर्षभरापासून शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

0

मारेगाव: मारेगाव तालुका स्थळा पासून जवळपास पाच की.मी.अंतरावर असलेल्या पाथ्री येथील वाॅटर फ़िल्टर प्लांट गेल्या वर्ष भरापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शोभेची वास्तु बनलेल्या प्लान्टपासून शुद्ध पाणी कधी मिळणार याची प्रतीक्षा गावकरी करीत आहे.

तालुक्यातील गट ग्रा.प.पाथ्री येथे गावाच्या विकास निधीतून व ग्रामस्थांच्या लोकवर्गनितूंन पाथ्री वासिया करिता शुद्ध पाण्याच्या सोयी साठी मोठ्या गाज्यावाज्यात वॉटर फ़िल्टर प्लांट तयार करण्यात आला. यामध्ये सर्व जलशुद्धिकरणाचे यंत्रा सह आदी सूविधा पण निर्माण करण्यात आल्या, आता आपल्याला पिण्याचे शुद्ध मिळणार असल्याचा आनंद गावकर्या मध्ये द्विगुणित झाला. प्लांट चा शुभारंभ आज ना उदया होणार असल्याची प्रतीक्षा करीत वाॅटर प्लांट तयार होवून एक वर्ष झाले. मात्र शुद्ध पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या पाथ्रीकराना पिण्याचे शुद्ध पाणी येथील ग्रा.प.सरपंच सचिव यांच्या उदासीन धोरणा मुळे प्यायला मिळाले नाही.

वेळोवेळी ही बाब ग्रामस्थानी ग्रा.प.व प.समितिच्या निदर्शनास आणून यावर दुर्लक्ष होत असल्याने अश्यातच नेहमी समाजकार्याची धडपड असलेल्या गावाच्या विकास कामा साठी झटणाऱ्या गावातील युवकांनी ही व्यथा वणी बहुगुणीजवळ बोलून दाखवली.

येथील ग्रा.प.च्या नियोजना अभावी व सरपंच सचिव यांच्या उदासीनते मुळे गावातील रस्ता नाली व पाण्याच्या समस्येशी ग्रामस्थ तोंड द्यावे लागत आहे. गावातील नाल्या,सांड पाण्याने तुडुंब भरून नालीतील घानेरडे सांड पाणी रस्त्यावर उतरून कुणाच्या घरात सुद्धा जावून ऐन जाने येन्याच्या रस्त्यावर सांड पाणी साचुन राहत असल्याने नागरिका कडून रोष व्यक्त होत आहे .गावात  मुबलक पाणी असलेल्या एकाच विहीरितुंन नळा द्वारे पाणी पुरवठा केल्या जात असून मात्र पाण्याची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी त्या विहिरित ग्रा.प.कर्मचारी ब्लीचिंग पावडर सुद्धा टाकत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावाच्या विकासात्मक झालेल्या स्मशानभूमी व रस्त्याच्या कामात ही गैर प्रकार झाला असल्याची ओरड  ग्रामस्थकडून होत आहे.तरी वरीष्ठानी यावर लक्ष देवून गेल्या एक वर्षा पासून शोभेची वास्तु बनलेले वाॅटर फ़िल्टर तातडीने चालू करण्याची मागणी जोर धरीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.