धक्कादायक ! भालेवाडीत डायरियाची लागण

11 रुग्ण रुग्णालयात, गावात आरोग्य पथक दाखल

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: चारशे लोकवस्ती असलेल्या भालेवाडी गटग्रामपंचायत मधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिक बाधित झाले आहे. अकरा रूग्णांना मारेगाव येथील रूग्णालयात दाखल करन्यात आले असुन भालेवाडीत आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणाने ग्राम पातळीवर डायरीयाची लागण झाल्याने प्रशासनाप्रती संतापाची लाट उसळली आहे.

मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथे एक किलोमीटर अंतरावरून ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठा करणारी टाकी 5 हजार लिटर क्षेमतेची आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी एक किलोमीटर अंतराची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाइपलाइमधूनच सार्वजनिक नळाला आणि घरगुती नळाला पुरवठा होतो. ती पाईपलाईन जागोजागी फुटुन असल्याने, गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

बुधवारी गावातील अनेक लोकांना उलटी आणि हगवण सुरू झाली. त्यामुळे भालेवाडी येथे वेगाव येथील आरोग्य पथक दाखल  झाले. त्यामधे डाॅ. आर.वाय.शहारे, आरोग्य सहाय्यक डाँ. डी.एन.बाढे, मारेगाव पं.स.चे विस्तार अधिकारी एस.जी.जोवर यांचा समावेश आहे. हे पथक भालेवाडी येथे घरपोच भेटी देऊन, बाधीत रुग्णांवर उपचार करीत आहे.

पाणीपुरवठा करणारू पाण्याची टाकी अनेक महिण्यांपासुन स्वच्छ न केल्याचा आरोप गावकरी करीत आहे. गावकऱ्यांनी अनेक वेळा पाईपलाईन दुरस्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर निवदने सादर केले होते. पण पंचायत समिती प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी

रूग्णालयातील रूग्ण धोक्याबाहेर असल्याचे रूग्णालय सूत्रांनी सांगितले असून आजच्या आज पाईप लाइनची दुरस्ती करुन भालेवाडी कराना शुद्ध पाणीपुरवठा होईल अशी माहिती विस्तार अधिकारी यांनी वणी बहुगुणीला दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.